नवी दिल्ली
औद्योगिक व्यवसायात कार्यरत स्टार्टअप कंपनी ‘मॉगलिक्स’ने 2021 वर्षात 13 वी युनिकॉर्न कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. कंपनीचे मूल्य 1 अब्ज डॉलर्सच्या पार गेलं आहे. टाटा समूहाचे पाठबळ असणारी ‘मॉगलिक्स’ 6 वर्ष जुनी कंपनी आहे. आयआयटी, कानपूरचे माजी विद्यार्थी राहुल गर्ग यांनी ‘मॉगलिक्स’ची स्थापना केली होती. गुगल एशियामध्ये त्यांनी याआधी जाहिरात विभागाचे मुख्य म्हणून सेवा बजावली होती.









