मुंबई
टाटा ग्रुपची कंपनी असणाऱया टाटा स्टीलने आपले बाजार भांडवल एक लाख कोटी रुपये केले असून याद्वारे एक नवा इतिहास रचला आहे. यानंतर टाटा स्टीलचा समभाग शेअर बाजारामध्ये 882 रुपयांवर पोहचला होता. हा एक प्रकारचा नवा विक्रमच असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. टाटा स्टीलचे एकूण बाजार भांडवल वाढून 1.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी टाटा गुप्रमधील टाटा स्टीलने हा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात टाटा स्टीलला यश आले आहे. याप्रमाणेच धातू क्षेत्रातील निर्देशांकात मंगळवारी जेएसडब्ल्यू स्टील, सेल, जेएसपीएल आदी कंपन्यांचे समभागही शेअर बाजारात तेजी दर्शवत होते.









