तिरूवनंतपुरम
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱया टाटा पॉवरने केरळात एक कंत्राट मिळवण्यात यश मिळवले आहे. टाटा पॉवरला केरळात 488 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. केरळ राज्य वीज मंडळाकडून सदरचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे. याअंतर्गत टाटा पॉवर 100 एमडब्ल्यू क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार आहे. ऊर्जा खरेदी कराराअंतर्गत सदरची वीज निर्मितीनंतर मंडळाला वितरीत केली जाणार आहे. केरळ वीज मंडळाने यासंदर्भात सप्टेंबर 2020 मध्ये बोली लावण्याचे आवाहन केले होते.









