वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा केमिकल्सची प्रमोटर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीचे 18 लाखपेक्षा अधिकचे समभाग खरेदी केले आहेत. ओपन मार्केट ट्रांझॅक्शनच्या आधारे ही खरेदी करण्यात आली असून सदर समभागाचे मूल्य हे 76 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या बल्क व्यवहारातील माहितीच्या आधारे टाटा सन्सने टाटा केमिकल्समध्ये एकूण 18,07,245 समभाग खरेदी केले असून हा वाटा 0.71 टक्क्यांच्या हिस्सेदारीइतका आहे.
समभाग खरेदीच्या दरम्यान 420.20 रुपये प्रति समभाग दर होता. या भावासह एकूण व्यवहार मूल्य 76.07 कोटींवर आले आहे.
मुंबई शेअर बाजारात मात्र टाटा केमिकल्सचे समभाग 5.48 टक्क्यांनी वधारले होते.
427.35 रुपयांवर बंद झाले आहेत. बीएसईवर r या अगोदर कंपनीचे समभाग हे 313.5 रुपयांवर बंद झाले होते. तर एनएसईवर टाटा केमिकल्सचे समभाग 5.69 टक्क्यांच्या तेजीसोबत 428 रुपयांवर बंद झाले आहेत.
सप्टेंबरमध्येही खरेदी सप्टेंबर महिन्यात टाटा सन्सने टाटा केमिकल्सचे 22,10,425 समभाग खरेदी केले होते. तेव्हा खरेदारी ही प्रति समभाग 287.58 रुपयांच्या भावाप्रमाणे झाली होती. ज्याचे एकूण मूल्य 63.57 कोटी रुपयांच्या घरात पोहाचले आहे. ल्याची माहिती आहे.









