वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डिजिटल टेक्नॉलॉजी कंपनी टाटा कम्युनिकेशनने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्सची इसिम कंपनी ओएसिस स्मार्ट सिम युरोप एसएएसमध्ये (ओएसिस) 58.1 टक्क्यांची हिस्सेदारी अधिग्रहण करणार आहे. कंपनीने मात्र सदरचे अधिग्रहण करण्यास किती खर्च येणार आहे, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
ओएसिस इसिम आणि सिम टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी व पर्सनलाइज्ड सर्व्हिसेसचा विकास करत असून त्याची विक्री करणार आहे. इसिम इंटरनेट ऑफ थिंग्स आणि मशीन टू मशीन ऍप्लीकेशनसाठी सुरक्षित कमी खर्चातील सेल्युलर कनेक्टिविटी सादर करणार आहे. पारंपारिक सिमपेक्षा वेगळे असणारे इसिमवर दुरूनच नवीन कनेक्शन ऍक्टिवेट करता येणार आहे.
याकरीता ग्राहकाना कंपनीच्या केंद्रावर जाण्याची गरज भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इसिम मार्केटमध्ये संधी
टाटा कम्युनिकेशनच्या मुख्य स्ट्रटजी अधिकारी त्री फाम यानी म्हटले आहे, की जगात एम टू एम कनेक्शंसच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. ते पाहता सेवा उत्तम देण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले. इसिम मार्केटमध्ये वर्ष 2025 पर्यंत 2 अब्ज इसिम इनेबल्ड डिव्हाइसची विक्री होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.









