ऑनलाईन टीम / दोदोमा :
टांझानियात एका खाणीत काम करणाऱ्या मजुराला 15 किलोची मौल्यवान रत्ने सापडली आहेत. गडद जांभळ्या रंगाची ही रत्ने असून ती ‘टांझानाईट जेम्स’ म्हणून ओळखली जातात.
सॅनिनिऊ लिझर असे रत्न सापडलेल्या मजुरांचे नाव आहे. खाणीत काम करताना लिझरला दोन टांझानाईट जेम्स आढळून आले. यापैकी एका रत्नाचे वजन 9.2 किलो आणि दुसर्याचे 5.8 किलो आहे. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफुली यांनी लिझरला फोन करून त्याचे अभिनंदन केले आहे.
टांझानाईट रत्न हे पूर्व आफ्रिकेच्या उत्तर भागात आढळते. सरकारने लिझरला या दोन मौल्यवान रत्नांच्या मोबदल्यात त्याला 7.74 अब्ज टांझानियन शिलिंग म्हणजे सुमारे 25 कोटी 36 लाख रुपये दिले आहेत.









