31 मार्चपासून लागू होणार नियम, अपोलो हॉस्पिटल यादीतून पडणार बाहेर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात मागील वर्षी लिस्ट झालेल्या झोमॅटो, पेटीएम आणि नायका यासारख्या कंपन्या निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकात समाविष्ट होणार असल्याची माहिती आहे. सदरचा हा नियम 31 मार्च 2022पासून लागू होणार आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. साधारणपणे नेक्स्ट 50 याचा अर्थ एनएसईमधील पहिल्या 50 कंपन्यांनंतर ज्या कंपन्या राहणार आहेत त्या कंपन्या होत. निफ्टीचा निर्देशांक 50 स्टॉकवर आधारीत आहे. बाजारामध्ये लिस्टेड कंपन्यांचे अंतर्गत परीक्षण करण्यात येणार असून त्यानंतर काही कंपन्यांना बाहेर केले जाईल तर काहींचा प्रवेश होण्याची शक्यता अधिक आहे. वर्षात दोन वेळा मार्च आणि सप्टेंबरमध्ये निफ्टी 50 ची पुनर्रचना केली जाते. पात्रतेच्या निकषावरच पेटीएम, झोमॅटो यांना नेक्स निफ्टी 50 मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समितीचा निर्णय
एनएसईच्या परिपत्रकानुसार समितीने निफ्टी इक्विटी निर्देशांकाच्या पात्रता नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर 2021 नंतर लिस्ट झालेल्या कंपन्या
नायका, पेटीएम, पॉलिसीबाजार आणि लेटेंट व्यू नेक्स्ट ऑक्टोबर 2021 नंतर लिस्ट झाले आहेत. एकूण सहा स्टॉक्स असून यामध्ये नायका, इंडियन ऑईल, माइंडट्री, एसआरएफ आणि झोमॅटो यांचा नेक्स्ट 50 मध्ये समावेश होणार आहे.
यानंतर अपोलो हॉस्पिटल, अरोबिंदो फार्मा, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंद्रप्रस्थ गॅस, जिंदाल स्टील आणि येस बँक यातून बाहेर जाण्याची शक्यता अधिक आहे.









