अमेरिकेच्या ब्रिघम अँड वूमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांच्या मते, डॉक्टर आणि रुग्णांनी अशा प्रकारच्या गोळ्याचे देणे आणि घेण्यापासून दूर राहिले पाहिजे.
- 685 महिलांवर अभ्यास : झोपेच्या गोळ्यांचा परिणाम कितपत होतो, हे जाणून घेण्यासाठी 685 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.
- या सर्व महिलांचे वय सरासरी 50 होते. या सर्वांना वेळेवर झोप लागत नव्हती किंवा उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय होती. झोपमोड होणे किंवा लवकर जाग येण्याचा त्यांना त्रास होता. यापैकी 238 महिलांना झोपेच्या गोळ्या दिला आणि 447 जणांना गोळ्या दिल्या नाही.
- तीन पैकी एकाला निद्रानाश : अभ्यासाच्या सुरवातीला प्रत्येक तीनपैकी एका महिलेला झोप न येण्याची तक्रार होती. 3 पैकी दोघींना अचानक झोपमोड होण्याची समस्या होती.
- डॉ. डॅनियल सॉलोमन यांच्या मते, झोप न येण्याची समस्या ही सामान्य होत चालली आहे. गेल्या दोन दशकात झोपेच्या गोळ्या घेणार्यांचे प्रमाण वाढले आहे.
- औषधांचा परिणाम 2 ते 12 आठवडे : संशोधक सोलोमन यांच्या मते, झोपेच्या गोळ्यांचा परिणाम हा 2 ते 12 आठवडय़ांपर्यंत राहतो. त्यानंतरही रुग्ण दीर्घकाळापर्यंत या गोळ्याचे सेवन करतात. डॉक्टर देखील काही काळापुरती गोळ्या देण्याचा सल्ला देतात. परंतु रुग्ण हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत राहतात.
- झोप न येण्याची कारणे : संशोधकाच्या मते, झोप कशामुळे लागत नाही, यावर विचार केला पाहिजे. बहुतांश लोकांना आजारपणामुळे झोप येत नाही. त्यात मधुमेह, रक्तदाब, दुखणे आणि नैराश्य यासारखे कारणे असू शकतात. त्यामुळे निद्रानाश टाळण्यासाठी योग्य आणि अचूक उपचार करायला हवेत.









