वृत्तसंस्था/ प्राग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या प्राग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत झेकच्या बार्बोरा क्रेजिकोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना आपल्याच देशाच्या मार्टिनकोव्हाचा पराभव केला.
महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या क्रेजिकोव्हाने एकेरीच्या अंतिम सामन्यात मार्टिनकोव्हाचा 6-2, 6-0 असा पराभव केला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. क्रेजिकोव्हाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे तसेच तिने मे महिन्यात स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धा जिंकली होती. अलिकडच्या कालावधीत क्रेजिकोव्हाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना 21 पैकी 20 सामने जिंकले आहेत. क्रेजिकोव्हाचे लक्ष आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आहे.