सध्या कोरोना या महाभयंकर व्हायरसमुळे सर्वच वाहिन्यांवरील मालिकांच्या नवीन भागांचे शूटिंग बंद झाले आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सुरक्षिततेसाठी झी युवा वाहिनीने सर्वच शोचे शूटिंग बंद ठेवले आहे. मात्र, झी युवा नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनवीन मनोरंजन घेऊन येत असते आणि म्हणूनच आता झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांसाठी गाजलेल्या मालिकांची एक नवीन मेजवानी आणली आहे.
झी युवा या वाहिनीचा मैत्रीचा आणि प्रेमाचा रंग दाखवताना ज्या मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावले होते आणि ज्या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या झाल्या होत्या अशा मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करणार आहेत. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता लव्ह लग्न लोचा आणि त्यानंतर 7.30 वाजता फुलपाखरू या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण दाखवण्यात आहे. त्याचप्रमाणे झी युवावर सोमवार ते गुरुवार रात्री 9.30 वाजता रात्रीस खेळ चाले आणि रात्री 10 वाजता एक घर मंतरलेलं या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहेत.









