जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश : काँग्रेसवर आरोपांच्या फैरी
भोपाळ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसमधून काढता पाय घेतल्यानंतर आणि बऱयाच राजकीय नाटय़ानंतर ज्योतिरादित्य सिंदिया व्यांनी अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षासाठी ज्योतिरादित्य सिंदिया यांचे पक्षासाठीचे योगदान जास्त महत्त्वाचे असेल असा आशावाद नड्डा यांनी व्यक्त केला. दरम्यान, पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून गुरुवारी ते राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
पक्षप्रवेशावेळी उपस्थित असणाऱया नड्डा यांच्यासह सर्वच पक्षश्रे÷ाr आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंदियांनी आभार मानले. सोबतच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडताना दुःख होत असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, यावेळीच त्यांनी काँग्रेस पक्षावर काही गंभीर आरोप केले. पक्षात नव्या नेतृत्त्वाला व्यक्त होण्याची संधी मिळत नसल्याची बाब त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तर, “आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. भाजपात मुख्य प्रवाहात त्यांना काम करण्याची संधी मिळेल याचे आम्ही आश्वासन देतो,’’ असे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.
काँग्रेसकडून जनतेला दिलेली अनेक आश्वासने पाळली गेली नसल्याचे ते यावेळी म्हणाले. शेतकऱयांच्या कर्जमाफीचे वचन कागदोपत्रीच असल्याचे सांगत युवा पिढीत रोजगाराच्याही संधी नसल्याचे वास्तव त्यांनी सर्वांपुढे ठेवले. राज्यातील सद्यस्थिती पाहता रोजगाराला संधी नसली तरीही भ्रष्टाचाराला मात्र वाव असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांनी भाजपला मिळालेल्या जनादेशाविषयीही वक्तव्य केले. मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत त्यांनी या आव्हानांचा सामना करण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यांच्या नेतृत्त्वामुळेच भारत उज्ज्वल यश गाठू शकेल, असे ते म्हणाले.
ज्योतिरादित्य, हर्ष चौहान यांना राज्यसभा उमेदवारी
मध्यप्रदेशमधून भाजपकडून ज्योतिरादित्य सिंदिया आणि हर्ष चौहान यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी पक्षाकडून दोघांच्याही नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारी रात्री झालेल्या भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये राज्यसभेच्या एकूण 11 जागा असून येत्या एप्रिल महिन्यात 3 जागा रिक्त होत आहेत.
भाजप नेतेपदी शिवराजसिंग चौहान ?
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्यप्रदेशात राजकीय भूकंप आला आहे. यामुळे मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर आता शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने हालचाली गतिमान केल्या आहेत. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी यासंबंधीच्या हालचाली वेग घेऊ शकतात.