युरोपीय देशांमध्ये राहण्यासाठी अनुकूल स्थिती
ग्लोबल एज वॉच इंडेक्सने अलिकडेच 96 देशांचे अध्ययन करून वृद्धांच्या वास्तव्यासाठी आदर्श असलेल्या देशांची यादी तयार केली आहे. याकरता आरोग्य, राहण्यासाठीचे वातावरण यासारखे निकष सामील करण्यात आले होते. यादीत 7 देश युरोपीय तर उत्तर अमेरिकेचे 2 आणि आशियाचा एक देश सामील आहे.
जगातील सर्व भागांमध्ये आयुर्मान वाढल्याने वृद्ध होणारी लोकसंख्या वाढत ओ. अलिकडेच उपलब्ध आकडेवारीनुसार जगभरात 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांची संख्या सुमारे 90 कोटी 10 लाख झाली आहे. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या 2.1 अब्ज होईल असा अनुमान आहे आणि त्यात वृद्धांचे प्रमाण 21.5 टक्के असेल.

वृद्धांच्या वास्तव्यासाठी सर्वात योग्य देश स्वीत्झर्लंड ठरला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी हा सर्वात चांगला देश आहे. या देशातील वृद्धांसाठीच्या धोरणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या धोरणांद्वारे येथील लोकांसाठी चांगले वातावरण आणि आरोग्याची व्यवस्था केली जाते. स्वीत्झर्लंडमध्ये खासगीत्वाचा आदर आणि सामाजिक संबंधांचा दर अधिक असल्याने वृद्धांमध्ये समाधान अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे म्हटले गेले आहे.
नॉर्वे हा देश यादीत दुसऱया स्थानावर आहे. येथील वृद्धांमध्ये सर्वात कमी दारिद्रय़ दिसून येते. येथील 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांना पेन्शन देण्यात येते. स्वीडनमधील वृद्ध लोकसंख्याही अत्यंत आनंदी आढळून आली आहे. जर्मनी यादीत चौथ्या तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे. तर नेदरलँड सहाव्या स्थानावर असून तेथील वृद्धांमध्ये दारिद्रय़ाचे प्रमाण केवळ 3 टक्के आहे. 65 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांना पेन्शन मिळते.









