ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुपम यांच्या आई दुलारी, त्यांचा भाऊ, त्याची पत्नी आणि भावाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी आई दुलारी हिला मागील काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. ती जेवण जेवत नव्हती. त्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. काही चाचण्या करण्यात आल्या. त्याचवेळी कोरोना टेस्टही करण्यात आली. तेव्हा आईची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सध्या तिच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरातील इतरांच्याही टेस्ट करण्यात आल्या. यात माझा भाऊ, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.