नवी मुंबई / ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात राजकीय स्तरावर भेटी- गाटींना वेग आला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकाच आठवढ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली. तर शरद पवार ही देशातील अनेक राजकीय नेत्यांना भेटत आहेत व पुढील राजकीय चढ – उतारांची चाचपणी करण्यात व्यस्त असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील काल, मंगळवारी शरद पवार यांची दिल्लीतील कृषी आंदोलनासंदर्भात भेट घेतली. याच भेटीवर भाजप नेते अतुल भातखळ राजू शेट्टी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
”काय दिवस आलेत राजू शेट्टींवर ”ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागतायत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत – राजू शेट्टी
राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला वेळ देत नाहीत अशी तक्रार ही शरद पवार यांच्याकडे राजू शेट्टी यांनी केली होती. यावर पवारांनी भेटीसाठी प्रयत्न करु असे आश्वासन शेट्टी यांना दिले होते. पवारांच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावले. राजू शेट्टी यांनी राज्यातील कृषी कायद्यांबद्दलची भुमिका घेताना शेतकरी संघटनांनची मते विचारात घेत निर्णय घ्यावेत अशी विनंती केली. राजू शेट्टी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.