प्रतिनिधी / बेळगाव
ज्ञान मंदिर इंग्लिश माध्यम शाळेमध्ये शहर क्षेत्रशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी विषय शिक्षकांची पाचवी कार्यशाळा नुकतीच पार पडली.
प्रमुख पाहुणे म्हणून सागर बीएड् कॉलेजचे डॉ. टी. एम. नौकुडकर उपस्थित होते. त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, तुलसीदास संघाच्या अध्यक्षा अनिता गावडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. के. एम. तारीहाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या कार्यशाळेमध्ये दहावीचा निकाल सुधारण्यासाठी पासिंग पॅकेजचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी धडय़ांवर आधारित प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी विविध शाळांमधून 47 हिंदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक डिचोलकर यांनी केले.
वर्षा पाटील यांनी आभार मानले.