झाडे-विद्युतखांब कोसळून वाहनांचे नुकसान, शाळेच्या इमारतीवरील पत्र्याचे छतही कोसळले
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून वळिवाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपणे सुरू केले आहे. शनिवारी दुपारीही सोसाटय़ाच्या वाऱयासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यावेळी जोरदार वाऱयामुळे झाडे व विद्युतखांब कोसळले. शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेले. सुदैवाने शनिवार असल्याने दुपारनंतर शाळा बंद होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वळिवाच्या या रुद्रावतारामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
वळिवाचा पाऊस हा जोरदार वाऱयासह आणि विजांच्या कडकडाटासह येतो. शनिवारी अशाच प्रकारे जोरदार वारा आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे शहापूर येथील महात्मा फुले रोडवरील एक झाड वाहनांवर कोसळले. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. विद्युततारा आणि खांबांवरही झाडाचा काही भाग कोसळल्याने विद्युतखांब कोसळले. सुदैवानेच त्या परिसरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.
महात्मा फुले रोड येथील जुन्या मारुती मंदिरसमोर विलायती चिंचेचे झाड होते. ते वाऱयामुळे बाजूला असलेल्या जीप व एका बोलेरोवर कोसळले. त्यामुळे त्या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तारांवर काही फांद्या पडल्यामुळे विद्युतखांबही कोसळला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. तातडीने हेस्कॉमला याची माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्युतपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. विद्युतखांब कोसळल्यामुळे काही भागातील वीजपुरवठाही ठप्प झाला होता.
शास्त्राrनगर येथेही पाचव्या क्रॉसजवळ एक झाड कोसळले. ते झाड मोकळय़ा जागेत कोसळल्याने फारशी हानी झाली नाही. शहरामध्ये अशाच प्रकारे लहान-मोठी झाडे तसेच फांद्या कोसळल्या. पावसाला जोर नसला तरी वाऱयाला अधिक जोर असल्याने अनेक ठिकाणी पत्रे उडून गेले आहेत. वळिवाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जोरदार वारा येऊन पावसाचे प्रमाण मात्र कमी झाले. दुपारीच ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील बैठे विपेते, फेरीवाले यांची तारांबळ उडाली.
जोरदार वाऱयासह अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुचाकीस्वारांनीही रस्त्याशेजारी वाहने पार्क करून आश्रय घेतला होता. पाऊस झाला तरी उष्मा कमी झाला नाही. त्यामुळे अजूनही पाऊस पडण्याची शक्मयता जाणकारांतून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वळिवाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले आहे. यापूर्वी शहराच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला. जोरदार वाऱयासह पावसाचे तेव्हाही आगमन झाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता शनिवारच्या पावसानेही मोठे नुकसान झाले आहे.
येळ्ळूर येथील शाळेच्या छताचे पत्रे उडून पडले
केवळ सुदैव म्हणून येळ्ळूर येथे मोठी दुर्घटना टळली आहे. शनिवार असल्याने शाळा अर्धा दिवस होती. पाऊस दुपारी सुरू झाला. यावेळी जोरदार वारा आणि विजांसह पावसाचे आगमन झाले. या जोरदार वाऱयामुळे येळ्ळूरवाडी शाळेवरील छताचे पत्रे शाळेच्या आवारातच पडले. यावेळी तेथे कोणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
येळ्ळूर रस्त्यावर दहा ते बारा झाडे कोसळली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. झाडे हटविणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर काही ग्राम पंचायत सदस्यांनी धाव घेऊन जेसीबीच्या साहाय्याने झाडे रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या पावसामुळे आणि वाऱयामुळे येळ्ळूर परिसरातही मोठे नुकसान झाले आहे.









