मुंबई
जॉन्सन अँड जॉन्सनचा दुसऱया तिमाहीतील नफा 35 टक्क्मयांनी घटला असल्याचे सांगण्यात येते. सध्याला कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वत्र वाढ झाल्याने त्यासंबंधी उपचार करण्यात अनेक इस्पितळे व्यस्त झाली आहेत. गुडघारोपणसह इतर बिगर महत्त्वाच्या शस्त्रक्रिया बहुतेक करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. म्हणूनच जॉन्सनच्या वैद्यकीय साधनांची कमी मागणी नोंदवली गेली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर वर झाला आहे. कंपनीचा नफा 3.63 अब्ज डॉलरवर घसरला आहे. वर्षापूर्वी हा नफा 5.62 अब्ज डॉलर इतका होता. कंपनी आपल्या कोरोनावरील लसीच्या मानवी प्रयोगावर सध्या काम करते आहे.









