सत्य घटनांवरून प्रेरित असणार चित्रपट
अभिनेता जॉन अब्राहमने मंगळवारी स्वतःचा आगामी चित्रपट ‘तेहरान’ची घोषणा केली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारि असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांची मॅडॉक फिल्म्स ही कंपनी करणार आहे. जॉन आणि दिनेश यांच्या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
तेहरान ऍक्शन-थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन अरुण गोपालन हे करत आहेत. पटकथा रितेश शाह आणि आशीष वर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपट पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जॉनने पोस्टर शेअर करत तेहरान या चित्रपटाची घोषणा केली आहे. पोस्टरवर शहरातील दृश्य दिसून येत आहे. तसेच उंच इमारतींदरम्यान ट्रफिकने भरलेला रस्ता तसेच एक भूमिगत मार्ग दिसून येतो.
जॉनचा अटॅक पार्ट-1 हा चित्रपट यंदा 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. चित्रपटात जॉन एका सैनिकाची भूमिका साकारत आहे. अटॅक हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचबरोबर शाहरुख खानचा पठाण आणि एक व्हिलन रिटर्न्स हे त्याचे चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. एक व्हिलन रिटर्न्समध्ये अर्जुन कपूर, तारा सुतारिया आणि दिशा पाटनी दिसून येतील.









