मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वैद्यकीय आणि अभियंता प्रवेशासाठी आवश्यक असणाऱया नीट आणि जेईई परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. जेईई मेन्स परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान तर नीट 26 जुलै रोजी होणार आहे. कोरोना संक्रमण आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे या परीक्षा दीर्घकाळापासून लांबणीवर पडल्या आहेत.
दहावी, बारावी आणि सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकालांच्या तारखही लवकरच जाहीर केल्या जातील, असे सांगून मंत्री निशंक म्हणाले, या परीक्षांसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन बैठकीची व्यवस्था असेल आणि याची संपूर्ण रुपरेषा तयार करण्यात आली आहे. शुक्रवारी याची अधिक माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले.
विविध परीक्षांच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना दीक्षा पोर्टलचा उपयोग करावा
लॉकडाऊन कालावधीत इ अभ्यास सामग्री उपयोगात आणावी
विद्यापीठ परीक्षा 1 जुलैपासून होण्याची शक्यता
पुढील वर्षाचे सत्र 1 ऑगस्टपासून सुरु होऊ शकते
अभ्यासक्रमातही घट होणार
ग्रामीण भागासाठी SWAYAM पोर्टल व SWAYAM PRABHA पोर्टलचा वापर









