मुंबई / प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच करोडपती कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना दिलेल्या भेटवस्तू जप्त करणार आहे.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, या अभिनेत्रींना काही पाळीव प्राणी देखील भेट म्हणून देण्यात आले होते, अशा प्रकरणांमध्ये ती एक समान मूल्याची मालमत्ता ठरते. एका उच्चपदस्थ सूत्राने माध्यमांना सांगितले की, नोरा फतेहीला ‘सुकेश चंद्रशेखर यांनी भेट दिलेली बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेण्यास अधिकारी घेऊ शकतात’,
सुकेश चंद्रशेखर हा अनेकांकडून करोडोंची खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटकेत असून,त्याने केलेल्या गैरव्यवहारांची आणि त्याच्या संबंधित व्यक्तिंची ईडी कडून चौकशी केली जात आहे.