बेंगळूर
इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माती कंपनी सिंपल एनर्जी आपल्या पहिल्या सिंपल वन स्कूटरची डिलिव्हरी येत्या जूनपासून करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने सदरची नवी स्कूटर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात सादर केली होती. सिंपल वनसाठी आतापर्यंत 30 हजार जणांनी बुकिंग केले असल्याची माहिती आहे. सदरच्या स्कूटरची किंमत 1.09 लाख रुपये इतकी असणार आहे. जूनपासून या गाडीच्या प्रत्यक्ष वितरणाला सुरूवात होणार आहे.









