आझाद मैदानावरील आंदोलनाला दिला पाठिंबा
सांगरुळ / वार्ताहर
जुनी पेन्शन योजनेची लढाई आपण सर्वजण मिळून नक्की जिंकू. या लढाईची तीव्रता आणखी वाढली पाहिजे, त्याला माझा पाठिंबा राहील, त्यात मी कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.आझाद मैदानावर १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज आमदार आसगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी शिष्ठमंडळाच्यावतीने आमदार आसगावकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना आ. आसगावकर म्हणाले, सर्व घटकांना जुनी पेन्शन मिळावी, यावर मी ठाम आहे. या प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सुटला पाहिजे. जुन्या पेन्शनचा अहवाल पुणे आयुक्तांनी तयार केला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असा माझा विश्वास आहे. मी शिक्षकांचा प्रतिनिधी आहे. याची जाणीव ठेवून मी शिक्षकांच्या येताना प्रथम प्राधान्य देणार. तुम्ही रस्त्यावरच्या लढाईमध्ये अग्रेसर रहा, मी विधिमंडळातील लढाई लढतो. यामध्ये आपण नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील,कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, शिक्षक नेते आण्णा गायकवाड, एम. एन. पाटील, समीर घोरपडे, कृष्णदेव बेहेरे, रेवण अवताडे, रामचंद्र जानकर, सुनील भोर, संजय वाळे, खेडकर सर, संभाजी पाटील, संतराम पाटील, राजू पठाण सुनील हिंगे, संजय इगे, दिलीप डोंगरे, श्रीधर गोंधळी, सुदेश जाधव आदी उपस्थित होते.