गावठी मिरची, कोकम सोले, सुकी मासळी, कांदा साठवण्यासाठी पारंपारिक पद्धत

उदय सावंत/वाळपई
एकेकाळी पूर्णपणे ग्रामीण भाग समजल्या जाणाऱया सत्तरी तालुक्मयातील जीवनशैली बदलली आहे. यामुळे पारंपरिक जुन्या आठवणींचा विसर पडू लागलेला आहे. असे असताना सत्तरी तालुक्मयात अजूनही पुरमेंताची बेगमी करण्याचे काम अजूनही अनेक लोक जपताना दिसत आहेत. पारंपरिक कोकमची सोले, सुकी मासळी, फणसाच्या गऱयांची साला व वकोम्याची सोला, गावठी कांद्यांच्या मोळय़ा अशा अनेक वस्तू आजही पावसाळय़ाची बेगमी करण्यासाठी जपून ठेवल्या जातात. तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये ही पारंपरिक स्थिती पहावयास मिळत आहे.
सत्तर गावाची सत्तरी अशी ओळख असलेल्या सत्तरी तालुक्मयात जीवनशैली बदलत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये जवळपास 80 टक्के घरे ही कौलारु होती मात्र या जागेवर आज काँक्रिटची घरे उभे राहू लागले आहेत. प्रत्येकाची जीवनशैली बदलू लागली आहे. यामुळे या बद्दलच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वस्तू टिकवण्याची संस्कृती हळूहळू लुप्त होऊ लागलेली आहे.
पावसाची बेगमी करण्याची संस्कृती सत्तरी तालुक्मयात शेकडो वर्षांपासून रूढ झालेली आहे. मात्र जसजशी वर्ष गेली तसतशी ही संस्कृती हळूहळू कमी होताना दिसत आहेत.
फणसाची साला अजूनही जपण्यासाठी प्रयत्न
सत्तरी तालुक्मयात प्रचंड प्रमाणात फणसाचे नुकसान होताना दिसत आहे. ज्यावेळी सत्तरी तालुक्मयातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी फणसाच्या गऱयांवर अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत होती. आज फणसाचे व्यवस्थापन होत नसल्यामुळे नुकसान होताना दिसत आहे. तरीसुद्धा सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांमध्ये पावसाची बेगमी करण्याच्या दृष्टिकोनातून फणसाचे गरे सुकून पावसात जपण्याची परंपरा कायम आहे. ग्रामीण भागामध्ये या गऱयाना फणसाची साला असे संबोधले जाते.
फणस कोवळा असताना त्याचे गरे काढणे व त्यामधील बिया बाजूला करून गऱयांचे तुकडे करण्यात येत असतात. हे तुकडे व्यवस्थितपणे पाण्यामध्ये धुऊन त्याला मीठ लावून ते व्यवस्थितपणे पावसाळय़ासाठी साठवून ठेवण्यात येते. त्यानंतर याचा वापर गणेश चतुर्थी किंवा दिवाळी अशा सणात करण्यात येत असतो. अनेक गावांमध्ये फणसाची भाजी उत्तम प्रकारे बनवली जाते. फणसाच्या गऱयापासून फणसाची भाजी बनवत असतात.
कोकमची सोले आजही जपली जातात
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये आजही गावठी कोकमची झाडे आहेत. याला प्रचंड प्रमाणात उत्पादन होत असते. याची सोले करून विकली जातात. त्याला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. या कोकमची सोले करण्याची पद्धत प्रचलित झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोकम पिकल्यानंतर ती फोडून त्याची साल बाजूला केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या बिया सुद्धा बाजूला केल्या जातात. त्यानंतर ही कोकमची सोले सातत्याने आठ दिवस उन्हात सुकविले जातात. याला आगळं (कोकणचा रस) लावण्यात येत असतो. त्यानंतर मीठ लावून पावसाळय़ासाठी साठवून ठेवली जातात.
वकाम्याची सोले यांनाही चांगली मागणी
सत्तरीच्या जंगलांमध्ये आजही व वकाम्याची झाडे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. तरुण पिढीला या झाडांची माहिती अजिबात नाही. मात्र ज्ये÷ नागरिक या झाडाच्या संदर्भात चांगल्या प्रकारे माहिती देतात. या झाडांच्या फळांपासून चांगली सोले बनविली जातात. या सोलाना बाजारपेठेमध्ये मागणी आहे?. मात्र झाडे उंच असल्यामुळे ही फळे काढण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे या परंपरेकडे दुर्लक्षितपणा केला जातो.ण्कोकम प्रमाणे सोले तयार केली जातात. फळे फोडून त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. त्यानंतर ती झेजरुन त्याची सोले तयार केली जातात व ती पावसाळय़ासाठी साठवून ठेवले जातात. ही विशिष्ट पद्धत सत्तरी तालुक्मयाच्या अवघ्याच गावांमध्ये पहावयास मिळते.
सुकी मासळी, मीर्चीची बेगमी
मासळी हा गोमंतकीयांच्या दैनंदिन जेवणातील महत्त्वाचा घटक. मात्र पावसाळय़ामध्ये मासळी मिळत नसते. त्यामुळे पावसाळय़ात माश्याशी बेगमी करून तिचा वापर आजही केला जातो?. बाजारातील सुकी मासळी आणून ती व्यवस्थितपणे साठवून ठेवली जाते. त्यानंतर तिचा वापर दैनंदिन जेवणामध्ये केला जातो. एकेकाळी सत्तरी तालुक्मयामध्ये मोठय़ा प्रमाणात भात शेती करण्यात येत होती. यामुळे शेतामध्ये जेवण घेऊन जाताना या सुक्मया मासळीचा जास्त प्रमाणात वापर करण्यात येत होता. ही शेती बागायती पूर्णपणे बंद झालेले आहे?त. यामुळे सुकी मासळी साठवून ठेवण्याची पद्धत हळूहळू लुप्त होऊ लागलेली आहे.
दुसऱया बाजूने फ्रोजन मासळी मिळत असल्यामुळे सुकी मासळी साठवून ठेवण्याचे प्रमाणे आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. तरीसुद्धा सत्तरी तालुक्मयात आजही जे÷ नागरिक या सुक्मया मासळीचा पावसाळय़ामध्ये वापर करताना दिसत आहेत.
त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्मयात मिरची साठवून ठेवण्याची परंपरा ही अजूनही अनेक गावांमध्ये पहावयास मिळते.









