प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागाच्यावतीने वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक सचिन सबनिस उपस्थित होते.
सचिन सबनिस म्हणाले सध्या उद्योग क्षेत्रात अनेक बदल घडत असल्यामुळे नवनवीन संधींचा उपयोग करून घ्या. नवीन संशोधन होत असून, तांत्रिक गोष्टी शिकून घ्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. कृष्णशेखर लालदास यांनी कॉलेजच्या प्राध्यापक वर्गाचे आभार मानले. सलोनी पट्टणशेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर ज्योती तलरेजा-जामनानी यांनी आभार मानले.









