प्रतिनिधी/ बेळगाव
जीआयटी कॉलेजच्या आर्किटेक्चर विभागाने विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन नुकतेच भरविले. याचे उद्घाटन प्रोफेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. एच. बी. राजशेखर यांच्या हस्ते करण्यात आले. या विभागाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंटस् ऑफ आर्किटेक्चर (नासा) ची सलग दुसऱया वषी लुईस खान ट्रॉफी पटकाविली आहे.
नासाबरोबर 350 हून अधिक कॉलेज सलग्न आहेत. या प्रदर्शनामध्ये 75 हून अधिक नामवंत आर्किटेक्चरच्या कॉलेजनी भाग घेतला होता. त्यामध्ये जीआयटीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विभाग प्रमुख डॉ. रुपाली काविलकर, नासाचे समन्वयक प्रा. प्रतिक्षा नावेलकर, प्रदर्शन समन्वयक प्रा. ज्योती पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. राजशेखर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशीच आपली प्रगती सुरू ठेवावी. प्राचार्य जयंत कित्तूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









