सात तालुक्यात एकही नवा रुग्ण नाही : बरे होण्याचे प्रमाण 94.62 वर : मागील आठ दिवसात एकही मृत्यू नाही
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासह मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभाग यशस्वी झाला आह़े मागील आठ दिवसांत एकही कोराना बाधिताचा मृत्यू न होणे समाधानाची बाब मानली जात आहे. दिवाळीनंतर वाढू लागलेल्या रुग्णसंख्येलाही सोमवारी काहीसा ब्रेक लागला आहे. सोमवारी जिह्यात केवळ 3 नवे रुग्ण आढळले आहेत.
जिह्यात सोमवारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या 295 चाचण्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात 1 तर लांजामध्ये 2 असे फक्त 3 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 666 इतकी झाली आह़े 14 रूग्णांनी कारोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 200 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.62 झाले आह़े
एकूण रूग्ण-8666
नवे रूग्ण -03
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -319









