प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मागील सहा महिने बंद असलेल्या व्यायामशाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आह़े मात्र यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत़ हॅन्ड सॅनिटायझर, थर्मलस्कॅनिंग सारख्या उपकरणांचा वापर करून खासगी व्यायामशाळा सुरू झाल्या आहेत़ तर शासकीय व्यायामशाळा ह्या 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचे क्रिडा विभागाकडून सांगण्यात आले आह़े
देशभर कारानाचे वाढते संकट लक्षात घेता 23 मार्च पासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला होत़ा याचा फटका व्यायामशाळा चालकांना देखील बसला होत़ा कारोनाशी मुकाबला करतानाचा आर्थिक घडी बसविण्यासाठी शासनाकडून मिशन बिगीन सुरू करण्यात आले होत़े त्यानुसार दुकाने, मॉल, सार्वजनिक वाहतूक आदी टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आल़े मात्र व्यायामशाळांना परवानगी शासनाकडून देण्यात आली नव्हत़ी
मागील 6 महिन्यांपासून कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने व्यायामशाळा चालकांवर आर्थिक संकट उभे राहिले होत़े त्यासाठी जीम सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला होत़ा मात्र कारानाचे संकट टळलेले नसल्याचे सांगत शासनाकडून परवानगी देण्यासंदर्भात विचार करण्यात येत होत़ा दरम्यान नुकतेच राज्य शासनाच्यावतीने 25 ऑक्टोबर पासून जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होत़ी त्यानुसार जिह्यातील खासगी व्यामशाळा सुरू झाल्या आहेत़ मात्र शासकीय व्यायामशाळा या साफसफाईच्या काराणास्तव 1 नोव्हेंबर पासून सूरू करण्यात येतील असे क्रिडा विभागाकडून कळविण्यात आले आह़े
शासनाकडून मदतीची अपेक्षा
मागील सहा महिन्यांपासून व्यायामशाळा बंद असल्याने व्यायामशाळा चालकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आह़े कारोनोचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी र्निजंतुकीकरण व थर्मल स्क्रीनींग ऑक्सीमीटर आदींचा वापर करण्यात येत आह़े त्यामुळे होणाऱया खर्चाचे प्रमाण वाढले आह़े त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या व्यवसायाला बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत करावी- अमोल जाधव (एम फिटनेस जीम रत्नागिरी)









