प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये संपामुळे सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेले 39 कर्मचारी पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहेत़ या कर्मचाऱयांनी मागील काही दिवसात कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला होत़ा त्यानुसार एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून तातडीने अर्जाचा विचार करत कामावर हजर होण्यास मंजुरी दिल़ी आता कारवाई झालेले आणखी कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
राज्य शासनाकडून 31 मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी आवाहन केले होत़े त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले होत़े आता 1 तारखेनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत एसटीच्या 185 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आह़े तर 237 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली आह़े तर पुढील दिवसात आणखी काही कर्मचारी हे सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे रत्नागिरी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी विभागात सुमारे 4 हजार एसटी कर्मचारी आहेत़ यापैकी 700 कर्मचारी कामावर हजर होत आहेत़ तर 187 कर्मचारी हे अधिकृत रजेवर आहेत. त्यानुसार उर्वरित कर्मचाऱयांवर कारवाईचे पाऊल विभागाकडून उचलण्यात आले आह़े कर्मचाऱयाना नोटीस देवून कायदेशीर बाबी तपासून बडतर्फी अथवा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आल़े
450 हून अधिक फेऱया सोडण्यात यश
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील 2 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत़ या संदर्भात 330 एसटी कर्मचाऱयांना शासनाकडून निलंबित करण्यात आले होत़े या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे आदेश परिवहन विभागाकडून रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होत़े त्यानुसार बडतर्फीची कारवाई प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े दरम्यान शुक्रवारी एसटीच्या 450 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े एसटीचे चालक व वाहक मोठय़ा संख्येने कामावर हजर होत असल्याचे दिसत आह़े









