उकाडय़ाने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना दिलासा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
उकाडय़ाने हैरण झालेल्या रत्नागिरीकरांना रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या रिमिझिम पावसाने काहीसा दिलासा मिळाल़ा थंडगार वाऱयासह पडणाऱया या पावसामुळे जिह्यात कुठेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आह़े येत्या 24 तासात कधीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आह़े
रविवारी दिवसभर रत्नागिरीत ढगाळ वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. अखेर सायंकाळी रिमझिम पावसाने सुरूवात केल़ी दरम्यान पावसाने दमदार सलामी दिल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. यंदा पाणी टंचाईची भीषण समस्या जिल्हय़ाच्या विविध भागात दिसून आली होत़ी रत्नागिरी शहराचा विचार करता 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होत़ा यामुळे शहरवासीय पाणीचंटाईने पुरते हैराण झाले होत़े









