लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना मिळाला आधार
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार बंद झाले होते. रोजगार नसल्याचा जास्त फटका गरीब-गरजु, सर्वसामान्यांना बसला. खिशात पैसे नसल्याने आर्थिक चणचण भासु लागली. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या काळात पोस्ट बॅकेमुळे अनेक लोकांना आर्थिक आधार मिळाला.
शहरी, ग्रामीण, वाडीवस्त्यावर तसेच डोंगर माथ्यावर असणाऱया गांवामध्ये टपाल सेवा पोहचवित असतात. कंटेनमेंट झोनमध्येही टपाल वितरण, मेडीसिन पार्सल, घरपोच दिली. 1 एप्रिलपासून इंडिया पोस्टल पेमेंन्ट बॅकेची 30 हजार सेव्हिंग नवीन खाती उघडली. स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक डिव्हाईसद्वारे मनी ट्रान्सफर, आयएमटीएस, एईपीएस, विविध बिल पेमेंन्ट पेन्शन धारकांना घरपोच डिजिटल लाईफ प्रमाणपत्र, शासकीय फायदे डाक-पे ऍपद्वारे ग्राहकांच्या दारात सुरक्षित पद्धतीने सेवा देत आहेत. या टपाल सेवेबरोबरच वेगवेगळी मेडीसिन पार्सल, वेगवेगळे रिचार्ज, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, निवृत्तीधारकांची पेन्शन, आदी विविध शासकीय योजनांद्वारे बॅक खात्यांमध्ये जमा झालेले पैसे अडकून पडले होते. लॉकडाऊनमध्येही बॅकेतर्फे जिह्यात पाचशे पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांनी टपाल वाटपाबरोबरच जोखीम स्वीकारून शहरी व ग्रामीण भागातील 20 हजार नागरिकांना एईपीएस आधारे तब्बल 15 कोटी रूपयांचे घरपोच वाटप केले. शिष्यवृत्ती पात्र 3 हजार 500 विद्यार्थाची खाती पोस्टल पेमेंट बॅकेच्या माध्यमातून या काळात उघडण्यात आली. गरोदर महिलांची मातृत्व वंदन योजनेअंतर्गत 2 हजार खाती उघडण्यात आली आहेत.








