प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये मागील 24 तासात 416 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत़ नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधितांपैकी 190 रुग्ण आरटीपीआर चाचणीमध्ये तर 226 रुग्ण रॅपिड अँन्टीजन चाचणीमध्ये आढळून आले आहेत़ तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने 416 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे जिह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 हजार 42 झाली आह़े देशासह राज्यात कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग वेगाने कमी होत असताना रत्नागिरी जिह्यात मात्र अपेक्षेप्रमाणे नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे निर्देशांचे काटेकोर पालन व सूचनांची अंमलबजावणी यामध्ये प्रशासनासह नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे








