प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरावलेली असली तरी मात्र मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आह़े शनिवारी 12 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी जिल्हय़ातील एकूण मृतांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आह़े तर मृत्यूदर 3.22 पर्यंत वाढला आह़े एकूण मृतांची संख्या आता 1 हजार 46 इतकी झाली आह़े त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आह़े
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 6, चिपळूण 2, लांजा 1, राजापूर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 1 हजार 46 झाली आह़े तर रत्नागिरी जिह्यात मागील 24 तासात 372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 32 हजार 444 पर्यंत पोहोचली आह़े शनिवारी जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या 1 हजार 728 टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 147 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 225 अशी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आल़ी तालुकानिहाय मृतांच्या संख्येनुसार, रत्नागिरी 297, खेड 113, गुहागर 50, दापोली 96, चिपळूण 208, संगमेश्वर 138, लांजा 57, राजापूर 76, मंडणगड 11 मृत्यू झाले आहेत़
कामथेतील ‘त्या’ तरुणाचा मृत्यू ‘कोविड’मुळेच!
काळय़ा बुरशीच्या रोगाने म्हणजेच ‘म्युकरमायकोसिस’ची लागण झालेल्या संशयित तरुणाचा शुक्रवारी रात्री येथील चिपळूण-कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हे खरे नसून त्या तरुणाचा मृत्यू हा केवळ कोरोनामुळे झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकूण रुग्ण -32444
नवे रुग्ण -372
एकूण मृत्यू -1046
मृत्यू – 12









