प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये रविवारी कोरोनाचे 44 नवे रूग्ण मिळून आले आहेत़ तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बरे झालेल्या 66 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े उपचारात असलेल्या एकूण रूग्णांची संख्या 703 इतकी असून केवळ 243 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रविवारी जिह्यात कोरोनाच्या 2 हजार 460 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 677 चाचण्यांपैकी 18 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 783 पैकी 26 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यामध्ये मंडणगड-00, दापोली-5, खेड-3, गुहागर-6, चिपळूण-14, संगमेश्वर-2, रत्नागिरी-10, लांजा-2 तर राजापूर-2 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 77 हजार 726 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.66 इतका आह़े तर उपचारादरम्यान रत्नागिरी येथील 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 66 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 606 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.99 इतके आह़े तर 703 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 243 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़









