जिल्हाधिकारी शेखर सिंह
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात दिवसेंदिवस बाधित आणि बळींची संख्या वाढू लागली आणि त्यातच रेमडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा पडू लागल्याने सर्वत्र हाहाकार माजला. रेमडिसीवरसाठी रुग्णांसह नातेवाईकांची वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. मात्र, सोमवारी रेमडिसीवरचा पुरवठा सुरळीत झाला असून 409 रेमडिसीवर इंजेक्शन प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
सकाळी 109 रेमडिसीवर इंजेक्शन तर दुपारी 309 अशी मिळून सोमवारी दिवसभरात जिल्हय़ातील विविध कोव्हिड हॉस्पिटलला 409 इंजेक्शन्स प्राप्त झाली असून ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशा रुग्णांना ती देण्याचे आदेश दिले असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले.
जिल्हय़ात एकूण 46 कोव्हिड हॉस्पिटल असून त्यांना आयसीयू बेड व ऑक्सिजन बेडच्या 12 टक्के प्रमाणात रेमडिसीवर उपलब्ध करुन देणारे सध्या येत असलेल्या इंजेक्शननुसार उपलब्धतेनुसार शक्य असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले आहे. सोमवारी आलेल्या 409 इंजेक्शनचे वाटप थेट कंपनी, साताऱयातील डिस्ट्रीब्युटर स्काय फार्मा, सातारा, अरिहंत ड्रग्ज सेंटर, कोरेगाव, विस्नन फार्मा फलटण व सातारा डिस्ट्रीब्gयटर यांच्याकडून करण्यात आलेले आहेत.
चौकट
इंजेक्शन वापराच्या गाईड लाईन्स पाळा
जिल्हय़ात रेमडिसीवर तुटवडय़ाने जी स्थिती निर्माण झाली होती. ती पुरवठा सुरळीत होण्यामुळे सुधारणार आहे. मात्र वैद्यकीय व्यावसायिकांनी रेमडिसीवर इंजेक्शनचा वापर करताना केंद्र सरकारच्या क्लिनिकल नुसार अत्यावश्यक रुग्णांसाठी करावा. रुग्णांना रेमडिसीवर देण्यापूर्वी शासकीय फॉर्म भरुन द्यावा, डॉक्टर्सच्या प्रिसक्रिप्शनवर रुग्णालयाने इंजेक्शन कोणाकडू सप्लाय झाले ते बिलानिशी उल्लेखित करावे, इंजेक्शनचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या वाटप व्यवस्थेनुसार सनी फार्माकडून इंजेक्शन खरेदी करावी, अशा सूचना शेखर सिंह यांनी केल्या आहेत.








