बुधवारी 179 नवे रुग्ण : पाच जण दगावले
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील कोरोनाबाधितांच्या आकडय़ाने बुधवारी पाऊण लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर गेल्या 24 तासांत 179 नवे रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या सरकारी आकडय़ानेही 750 टप्पा पार केला आहे.
बुधवारी जिल्हय़ातील 179 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 75 हजार 81 वर पोहोचली असून गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 423 जणांना घरी पाठविले आहे. आतापर्यंत 72 हजार 208 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या घटत चालली आहे. बुधवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ात 2 हजार 121 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे साहजिकच बेडची मागणी कमी झाली आहे. तरीही जिल्हय़ातील 567 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
बुधवारी 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आजवरचा मृतांचा सरकारी आकडा 752 वर पोहोचला आहे. चिकोडी तालुक्मयातील तीन, बेळगाव तालुक्मयातील एक व रायबाग तालुक्मयातील एका बाधिताचा मृतांत समावेश आहे. बेळगाव, चिकोडी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढतीच आहे. अद्याप 3 हजार 297 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.
बाळेकुंद्री खुर्द, सांबरा, बसवणकुडची, रामनगर, हिंडलगा, गणेशपूर, नंदिहळ्ळी, कंग्राळी बी. के., तुरमुरी, टिळकवाडी, बोरगाव, अनगोळ, आझमनगर, बसव कॉलनी, बसवनगर, भाग्यनगर, बाकनूर, अयोध्यानगर, हिरेबागेवाडी, हिंडाल्को कॉलनी, शहापूर, कुवेंपूनगर, माळी गल्ली, माळमारुती, नेहरुनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, सैनिकनगर, उज्ज्वलनगर, विनायकनगर परिसरात बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्मयातील 51 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.
ब्लॅक फंगस पाठोपाठ आता डेल्टाप्लसचा धोका….
कोरोना दुसऱया लाटेत ब्लॅक फंगसचा फैलाव वाढला आहे. एका बेळगाव जिल्हय़ात 300 हून अधिक कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगसचीही लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच कर्नाटकात आता डेल्टाप्लसचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत म्हैसूर व बेंगळूर येथे डेल्टाप्लसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बेळगावसह संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात आली आहे.









