29 नवे रुग्ण, बेळगाव तालुक्यात रुग्णसंख्या अधिक
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ातील 35 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले. शनिवारी 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 17 जणांचा समावेश आहे.
शिवबसवनगर, कॅम्प, संभाजीनगर-वडगाव, विनायकनगर, राणी चन्नम्मानगर, रिसालदार गल्ली, नेहरु रोड-टिळकवाडी, महांतेशनगर, विद्यानगर, अनगोळ, सिद्धेश्वरनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सात वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 166 इतकी झाली असून त्यापैकी 77 हजार 895 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 384 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 5 हजार 211 जणांचे अहवाल यायचे आहेत.









