84 जण कोरोनामुक्त, नव्याने तीन रुग्ण : सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 66 : ट्रुनॅट मशीनद्वारे 241 व्यक्तींची तपासणी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यातील आणखी 16 रुग्णांनी ‘कोरोना’वर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयातून रविवारी आणखी 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84 झाली आहे. तर नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 154 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिह्यात शनिवारी रात्री उशिरा मालवण तालुक्यातील कट्टा-गुरामवाड येथील एक पॉझिटिव्ह आढळला. तर रविवारी आणखी दोन कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले. कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील एक व सावंतवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तीन नवीन रुग्ण वाढल्याने ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 154 झाली आहे. त्यातील 84 रुग्ण बरे होऊन ‘कोरोना’मुक्त झाले. तिघांचा मृत्यू आणि एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे जिह्यात सद्य स्थितीत 66 रुग्ण सक्रिय आहेत.
जिल्हय़ात 241 नमुने तपासले
जिल्हय़ात कोविड-19 च्या तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत 241 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सदर मशीनद्वारे नऊ जूनपासून जिल्हय़ात कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्हय़ात दोन ट्रुनॅट मशीन आहेत. रत्नागिरी जिल्हय़ातून एक ट्रुनॅट मशीन प्राप्त झाल्यामुळे तपासणीचा वेग वाढला आहे.
अ. क्र. विषय संख्या
1 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2,978
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 2,845
3 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 154
4 निगेटिव्ह आलेले नमुने 2,691
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 131
6 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 66
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 84
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3
9 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 90
10 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4671
11 संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 24130
12 शासकीय संस्थांमधील विलगीकरणातील व्यक्ती 161
13 गाव पातळीवरील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 22235
14 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 1,734









