रविवारी दिवसभरात एकही पॉझिटिव्ह नाही
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात आजपर्यत ६२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत, रविवारी रात्रीपर्यत जिल्हय़ात एकही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेंला नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७२० वर स्थिर आहे. दिवसभरात १३ कोरोनामुक्तांना डिसचार्ज दिल्याने आजपर्यत ६२९ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी दिली.
जिल्हय़ात आलेल्यांपैकी १ हजार ३०२ जणांची रविवारी तपासणी केली. त्यापैकी १७४ जणांचे स्वॅब घेतले असून ८२ जणांना आयसोलेटेड केले आहे. यामध्ये सीपीआरमध्ये २०९ जणांची तपासणी करून ५८ स्वॅब घेतले. तेथे ५९ पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आयजीएम हॉस्पिटलमध्ये ८९ जणांची तपासणी केली असून ५ स्वॅब घेतले आहेत. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १०२ जणांची तपासणी करून १० स्वॅब घेतले. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १६२ जणांची तपासणी केली. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ९८ जणांची तपासणी करून २९ स्वॅब घेतले. चंदगड कोरोना केअर सेंटरमध्ये ३७ जणांची तपासणी केली. आजरा केअर सेंटरमध्ये ५७ जणांची तपासणी करून १३ स्वॅब घेतले.
राधानगरी केअर सेंटरवर २२ जणांची तपासणी केली. हातकणंगले केअर सेंटरवर ६० जणांची तपासणी करून २ स्वॅब घेतले. कागल केअर सेंटरवर २६ जणांची तपासणी केली. भुदरगड केअर सेंटरवर ४२ जणांची तपासणी करून ५ स्वॅब घेतले. गगनबावडा येथे ४ जणांची तपासणी करून २ स्वॅब घेतले. पन्हाळा केअर सेंटरवर ५० जणांची तपासणी करून ९ स्वॅब घेतले. शाहूवाडीत १०६ जणांची तपासणी करून १५ स्वॅब घेतले. शिरोळ केअर सेंटरवर ११४ जणांची तपासणी करून ९ स्वॅब घेतले. हातकणंगले अतिग्रे केअर सेंटरवर ६५ जणांची तपासणी करून १६ स्वॅब घेतले. जिल्हय़ात रविवारी सायंकाळपर्यत आलेल्या १०६ रिपोर्टपैकी १०५ निगेटिव्ह आहेत. तसेच एकही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला नसल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
रविवार पॉझिटिव्ह रूग्ण ० एकूण ७२०
डिसचार्ज, कोरोनामुक्त १३ एकूण ६२९
कोरोना बळी ० एकूण ८
दिवसभरात १७४ जणांचे स्वॅब, १३०२ जणांची तपासणी,
स्वॅब रिपोर्ट १०६ पॉझिटिव्ह ० निगेटिव्ह १०५, डिस्चार्ज रूग्ण १३
आजपर्यतचे पॉझिटिव्ह रूग्ण ७२०
आजपर्यत कोरोनामुक्त संख्या ६२९








