प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारीच्या महिनाअखेरीस जिल्हय़ात कोरोनाचा कहर वाढू लागला असून दररोज 100 ते 150 च्या पटीत बाधित रुग्ण वाढू लागले आहेत. माण, सातारा तालुके हॉटस्पॉट बनले असून काही तालुक्यात दोन अंकी तर काही तालुक्यात एक अंकी वाढ तर दोन तालुके निरंक अशी स्थिती अर्ध्या जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरु झालाय.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी अहवालात 75 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला. तर रात्री उशिरा अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
माण तालुक्यात कोरोनाच कहर
रविवारी रात्रीच्या अहवालाने जिल्हय़ाची चिंता वाढली असून तब्बल 195 जणांचा अहवाल बाधित आला असून माण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. या तालुक्यात एकटय़ा दहिवडी शहरात 23 तर पळशी गावात 16 बाधित समोर आलेत. कराड तालुक्यातील घारेवाडी गावात 11 रुग्ण समोर आल्याने चिंता वाढू लागलीय. माण, सातारा, खंडाळा, खटाव आणि कराड तालुक्यात दोन अंकी संख्येने बाधित वाढ झालीय. तर चार तालुक्यात एक अंकी वाढ झाली असल्याने चिंता वाढली असतानाच पाटण व महाबळेश्वर तालुके निरंक राहिल्याचा दिलासा या अहवालाने दिला आहे.
650 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 42, कराड 36, फलटण 17, कोरेगाव 29, वाई 50, खंडाळा 6, रायगाव 54, पानमळेवाडी 211, महाबळेश्वर 12, म्हसवड येथील 20 व कृष्णा मेडिकल कॉलेज 73 असे एकुण 650 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
दोन बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे गुरुवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, हारणी ता. पुरंदर जि. पुणे येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 3,48,248
एकूण बाधित 58,994
एकूण कोरोनामुक्त 55,790
मृत्यू 1,855
उपचारार्थ रुग्ण 1,349
सोमवारी
बाधित 00
मुक्त 75
बळी 02








