बेळगाव, चिकोडी, हुक्केरीतील रुग्णांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी बेळगाव, चिकोडी व हुक्केरी तालुक्मयातील आणखी 13 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे जिल्हय़ात एकच खळबळ माजली आहे. बाधितांची संख्या वाढत चालली असून हा आकडा 153 वर पोहोचला आहे. खासकरून मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा जिल्हय़ातून आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.
राज्य आरोग्य विभागाने रविवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार बेळगाव तालुक्मयातील 5, चिकोडी तालुक्मयातील 5 व हुक्केरी तालुक्मयातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी राज्यात आजवर उच्चांकी 299 जणांचा पॉझिटिव्ह आला आहे. प्रथमच कर्नाटकात कोरोनाने 24 तासांत त्रिशतक पूर्ण केले आहे. परराज्यातून आलेल्या चाकरमान्यांमुळे ही संख्या वाढत चालली आहे.
महाराष्ट्रातून बेळगाव जिल्हय़ात परतलेला 27 वषीय तरुण, 32 वषीय युवक, 21 वषीय महिला, 1 वर्षाचा बालक, 28 वर्षीय महिला, 35 वषीय युवक, 27 वषीय तरुण, 25 वषीय तरुण, 3 वर्षाचा बालक, 47 वषीय इसम, 35 वषीय युवक व नवी दिल्ली येथून परतलेले 21 व 23 वषीय तरुण असे एकूण 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
या सर्व 13 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार उस्मानाबाद जिल्हय़ातून चिकोडी तालुक्मयातील नणदीवाडी येथे आलेले दोघे जण, महाराष्ट्रातून हिरेकोडी येथे आलेला एक जण व चिकोडीत आलेले दोघे असे चिकोडी तालुक्मयातून पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
बेळगाव तालुक्मयातील अगसगे येथील दोघे जण, म्हाळेनट्टी, कंग्राळी खुर्द व हंदिगनूर येथील प्रत्येकी एक असे एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हंदिगनूर येथील एका दहा वषीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रविवारी त्याच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका हंदिगनूर गावात रुग्णसंख्या 3 वर पोहोचली आहे. बेळगाव तालुक्मयातील पाचही जण मुंबईसह महाराष्ट्रातून परतलेले आहेत.
शनिवारपासून आरोग्य विभागाने दुपारचे बुलेटिन बंद केले आहे. रोज सायंकाळी एकच बुलेटिन जारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळय़ा राज्यांतून आपल्या गावी परतलेल्या चाकरमान्यांमुळे कर्नाटकात रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत चालली असून रविवारी एका दिवसात 299 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार वेगवेगळय़ा राज्यातून परतलेल्या चाकरमान्यांमुळे बेळगावातील बाधितांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. 14 दिवस क्वारंटाईनमध्ये असलेल्या 2 हजार 251 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल आल्यानंतर जिल्हय़ातील बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका आहे.
14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये
5 हजाराहून अधिक
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ई-पास मिळवून जिल्हय़ात परतलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. 5 हजार 206 जणांना चौदा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी सायंकाळी दिली आहे. आतापर्यंत 12 हजार 346 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. 9 हजार 764 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 110 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला आणखी 2 हजार 251 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.









