दोघांचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील ६८ वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील आसवली येथील ६० वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता. खटाव तालुक्यातील पाचवड येथील ३० वर्षीय पुरुष व विसापूर येथील ७१ व ६२ वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील काळोशी येथील ३९ वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील २८ व २६ पुरुष व ५० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
१८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार १८१ जणं निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.








