प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार आहे. तसेच सज्जनगड येथे रामदास नवमी, स्वा. सावरकर पुण्यदिन, शंभू महादेवाचा महाशिवरात्री हा उत्सव साजरा होणार आहे. कोविड विषाणुचा प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक स्थळे, लग्न विविध आंदोलने यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.









