प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारपासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. जिल्ह्यात नॉन रेड झोनमध्ये असल्याने एसटी बस वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील दस्तनोंदणी, प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह अन्य कार्यालये सुरु होणार आहेत. शुक्रवारीपासून दोन प्रवाश्यांची वाहतूक करण्यास रिक्षाला परवानगी मिळाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कंटेन्मेंट झोन) पूर्वीचेच निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती गुरूवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.








