क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेतर्फे घेतलेली जिल्हा स्केटींग स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 ते 17 वयोगट मुले – यशपाल पुरोहित सुवर्ण, संतोपष पाटील रौप्य, सक्षम जाधव कांस्य. मुली – प्राची शिंदे सुवर्ण. 11 ते 14 वयोगट मुले- अमेय याळगी सुवर्ण, देवण बामणे रौप्य, निरज चिंचलीकर कांस्य, मुली – करूणा वागळे सुवर्ण, सदा शेख रौप्य, खुशी राणे कांस्य. 14 ते 17 वयोगट मुली – होनगी सुवर्ण, श्रेया वाघेला रौप्य, शर्वरी साळुंखे कांस्य. 17 वर्षावरील मुली भक्ती हिंडलगेकर सुवर्ण. 9 ते 11 वयोगट मुले – साईराज मेंडके सुवर्ण, अथर्व भुते रौप्य, वैजनाथ पाटील कांस्य. 9 ते 11 मुले – सत्यम पाटील सुवर्ण, सौरभ साळुंखे रौप्य, भाऊ पाटील कांस्य. मुली गट – मोनिषा टी सुवर्ण, शर्वरी दड्डीकर रौप्य, सर्वदा दड्डीकर कांस्य. 7 ते 9 वयोगट मुले – विहान कांगळे सुवर्ण, आर्यन कामाण्णाचे रौप्य. मुली – एका निलगौड सुवर्ण. 5 ते 7 वयोगट मुले – प्रणित बीडी सुवर्ण, आर्य कदम रौप्य, रियांस शेखरी कांस्य. मुली – आराध्या पी. सुवर्ण, अक्षता गावडे रौप्य, कीर्ती भोसले कांस्य. स्पर्धेचे उद्घाटक राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील राऊत, श्रेयस गुरव, सुर्यकांत हिंडलगेकर, चिन्मय देसाई, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, नागराज, प्रकाश पाटील, प्रशांत कांबळे, प्रभाकर चौगुले आदी उपस्थित होते.









