अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 27 नोव्हेंबर, सकाळी 11.00
● नव्याने बाधित 25 जण
● शुक्रवारी दिवसभरात 2207 जणांचे स्वॅब तपासणी
● नोव्हेंबरच्या 26 दिवसात 677 जण बाधित तर 63,627 जणांचे स्वॅब तपासणी
● जिल्ह्यात शिथिलता आल्याने नागरिकांना मनमोकळेपणा
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना नोव्हेंबर महिना हा दिलासा देणारा ठरला आहे. गेल्या 26 दिवसात 63 हजार 627 जणांचे स्वॅब तपासणी केली गेली. तर 677 जण बाधित झाले होते. काल शुक्रवारी दिवसभरात 2207 जणांचे स्वॅब तपासणी केली असून, त्यामध्ये नव्याने 25 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. नोव्हेंबर महिना हा जिल्ह्यासाठी सुखद ठरला असून, काल रात्री जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आणखी नियम शिथिलता दिल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मनमोकळेपणा मिळू लागला आहे.
नव्याने जिल्ह्यात 25 जण बाधित
जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 31 लाख एवढी आहे. आतापर्यंत 22 लाख 94 हजार 573 जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत 2 लाख 51हजार 820 जण बाधित संख्या आहे तर आतापर्यंत कोरोनामुक्तीची संख्या 2 लाख 44 हजार 405 एवढी आहे तर कोरोनामुळे 6 हजार 476 जणांचा आतापर्यंत बळी गेलेला आहे. शुक्रवारी दिवसभरात 2207 जणांची तपासणी करण्यात आली असून 25 जण बाधित आढळून आले आहेत.
सातारा तालुका अजून टॉपलाच
सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यातील येतात. काही रुग्ण हे आपला पत्ता व ठिकाण सातारा सांगतात. त्यामुळे सातारा तालुका हा टॉपला दाखवला जात आहे, असे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील आढळून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये जिल्ह्यातील रुग्ण व इतर रुग्ण असल्याने सातारा तालुक्यातील प्रमाण कमी आणण्यात यश आले आहे. तालुकानिहाय बाधित आकडेवारी आतापर्यंत. सातारा 52,148, फलटण 37,477, माण 18,041, खटाव 25,920, कराड 39,277, खंडाळा 14,202, जावली 10,048, वाई 15,787, कोरेगाव 21,969, पाटण 10,150, महाबळेश्वर 4,726, इतर 2,192 अशी आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमुने 22,94573
एकूण बाधित 2,51, 820
कोरोनामुक्त 2,44,405
एकूण मृत्यू 6,476
सक्रीय रुग्ण 241
शनिवारी
बाधित 25
नमुने 2207









