कामगाराने चोरली वीज, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीत घातली लाकडे
प्रतिनिधी/सातारा
शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी करुनही वीज पंपासाठी कनेक्शन दिले जात नाही. परंतु ठेकेदाराकडून दिवसा ढवळय़ा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वीजेची चोरी होत असल्याचा प्रकार रयत क्रांती संघटनेचे शंकर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांने चक्क तोडलेली लाकडेच पळवताना कॅमेऱ्यात टीपण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात छुपे छुपे चोरी चोरी असाच प्रकार सुरु आहे.
शासनाचे नियम व अटी हे सर्वसामान्यांच्या बाबतीतच असतात हे वारंवार पहायला मिळते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विद्युत कनेक्शनाची मागणी होत होती. 2014 पासून हजारो विद्युत कनेक्शन ही पैसे देवून प्रलंबित ठेवण्यात आली. असे असताना शेतकऱ्यांना वीज दिली जात नाही. वीजेची बिले अव्वाच्या सव्वा दिली जातात अन् ती थकली की लगेच तोडली जातात. आणि जे लोक शासनाच्या कार्यालयाच्या आवारात वीजेची चोरी करतात. त्यांना मोकाटच सोडले जात आहे, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे शंकर शिंदे यांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, याच कार्यालयाच्या आवारात तोडण्यात आलेल्या झाडांची पळवापळव सध्या सुरु आहे. ही पळवापळव एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीत लाकडे घालून हे कार्य करताना अलगद कॅमेऱ्यात सापडलेले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शासकीय कार्यालयात चोरीचोरी असाच प्रकार उघडकीस आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









