राज्याचे ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन व्दारे मागणी
म्हैसाळ / वार्ताहर
जिल्हा परिषद सांगलीची सर्वसाधारण सभा व्हीडिओ कॉन्फरनसद्वारे ना घेता ती समक्ष खुली घेणेसाठी परवानगी मिळावी यासाठी जि .प अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन व्दारे मागणी केली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सभा व समित्यांच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारेच घ्याव्यात ,असा आदेश शासनाच्या ग्राम विकास मंत्रालय ने दि.२५/८/२०२०च्या आदेशानुसार दिले आहे.शिवाय सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे सदरची सर्वसाधारण सभा खुली घेणे अशक्य झाले आहे.
दरम्यान बहुसंख्य सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे सभा घेणे ,शिवाय त्यामध्ये आपली मते मांडणे तांत्रिक दृष्ट्या काही ना अडचणीचे ठरत आहे.यामुळे सदरची सभा समक्ष खुली घेणेची मागणी केली आहे.तरी याचा विचार करून सभा समक्ष खुली घेणे साठी परवानगी द्यावी अशी मागणी सौ कोरे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.याकामी कागल येथे जाऊन ना.मुश्रीफ यांची प्रत्यक्ष भेटून सभेसाठी मागणी केली आहे. यावेळी नंदकुमार कोरे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








