प्रतिनिधी/ सातारा
शासकीय कार्यालयांचीच थकबाकी मोठी असते. गेली सहा महिने महावितरण कंपनीचे अधिकारी जिल्हा क्रीडाधिकाऱयांकडे लाईट बिलाचे पैसे तेवढे भरा अशी विनंती करत होते. परंतु त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे असे उत्तर येत होते. सोमवारी वैतागून महावितरणच्या वसुली पथकाने छत्रपती शाहु क्रीडा संकुलाचे विद्युत कनेक्शनच कट केले. त्यामुळे जिल्हा क्रीडाधिकाऱयांना कोव्हिड सेंटरला जागा देऊन चूक केली अशी भावना वाटू लागली आहे. खेळाडूंमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
जिह्यात कोरोनाचा जेव्हा कहर सुरु होता तेव्हा जिल्हाधिकाऱयांनी शाहु क्रीडा संकुलातील बॅडमिटन कोर्ट ताब्यात घेतले होते. तेथे कोरोनाचा कक्ष सुरु केला होता. हा कक्ष पाच ते सहा महिन्यापूर्वी बंद केला. परंतु तेथील हस्तातंरण हे जिल्हा क्रीडाधिकाऱयांकडे करण्यात आले नव्हते. तेथील लाईट बिल ही तब्बल 85 हजार रुपयांचे थकले होते. त्याकरता सहा महिन्यापासून महावितरणचे अधिकारी तब्बल पाच वेळा क्रिडाधिकाऱयांकडे जाऊन विनंती करत होते. परंतु त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यांनी दिले की भरतो असे सांगितले जात होते. तब्बल सहा महिने होऊनही लाईट बील भरले जात नसल्याने सोमवारी महावितरणच्या वसुली पथकाने कनेक्शन कट केले. यामुळे खेळाडूंमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.








