प्रतिनिधी / बेळगाव
जैन इंटरनॅशनल टेड ऑर्गनायझेशन (जितो) तसेच जितो महिला व युवा विभाग यांच्यावतीने महावीर ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारने 18 वर्षांवरील सर्वांनीच लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी तरुण-तरुणींनी रक्तदान करावे. जेणेकरून गरजू रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकेल, या हेतूने हे शिबिर घेण्यात आले. महावीर ब्लड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन कटारिया यांनी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी जितोचे अध्यक्ष सुनील कटारिया, कार्यवाह अंकित खोडा, महिला विभागाच्या अध्यक्षा अरुणा शहा, कार्यवाह शिल्पा हजारे, युवा विभागाचे अध्यक्ष अमोघ निलजगी, कार्यवाह प्रकाश जक्कण्णावर उपस्थित होते. शिबिरासाठी मनोज संचेती, प्रवीण खेमलापुरे यांनी पुढाकार घेतला. या शिबिरात 100 हून अधिक जणांनी रक्तदान केले.









