वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता जिओच्या पोस्टपेड ग्राहकांना जिओची सेवा वापरावयाची असल्यास त्यांना येत्या काळात अधिकची रक्कम द्यावी लागणार असल्याचे संकेत आहेत. ट्रायच्या वेबसाईटवर आलेल्या नवीन प्लॅनमधून ही माहिती स्पष्ट होत असून जिओ ग्राहकांना सिक्मयुरिटी डिपॉझिट म्हणून काही रक्कम जमा करणे बंधनकारक राहणार आहे. ग्राहकांना यामध्ये 500 ते 1800 रुपयांपर्यंतची रक्कम सिक्मयुरिटी डिपॉझिटरुपी भरावी लागणार आहे.
रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी 399 ते 1499 रुपयापर्यंतचे प्लॅन हे पोस्टपेड प्लस सर्व्हिससाठी आणखी सादर करण्यात आले आहेत.
असून इन फ्लाइट कनेक्टिव्हीटी पॅक्स आणि इंटरनॅशनल रोमिंग पर्याय दिले असल्याचे ट्रायच्या वेबसाईटवरील माहितीमधून स्पष्ट केले आहे.









